News34 chandrapur गुरू गुरनुले
मूल - नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.
मूल तालुक्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत असलेल्या २१ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या १८४६ शेतकऱ्यांनी शेतीच्या माध्यमातुन पिक कर्ज घेवुन नियमित मुदतीच्या आत भरणा केला आहे. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणे आवश्यक होती माञ फक्त २४ शेतकऱ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली असल्याचे दिसुन येते. त्यामुळे चातकासारखी वाट बघणाऱ्या १८२२ शेतकऱ्याची घोर निराशा होऊन अजूनही मुल तालुक्यातील शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत.
Mahatma Phule Loan Waiver Scheme
शेतकऱ्याची हक्काची बँक म्हणुन ओळखली जाणारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव घेतले जाते. या बँकेने शेतकरी , युवा वर्ग व महिलांना विविध योजनेचा लाभ देवुन आर्थिक दृष्टया सक्षम बनविण्याचे काम करीत आहे. एवढेच नव्हेतर शेतकऱ्यांना दुर्धर आजाराची काळजी घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यात येत आहे. विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी याच बँकेचा माध्यमातुन पिक कर्ज घेत असतात व नियमित मुद्द्दतीच्या आत त्या कर्जाचा भरणा करीत असतात. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आली. मूल तालुक्यात प्रोत्साहन रक्कम मिळण्यासाठी एकुण १८४६ शेतकरी पात्र छाननीनंतर ठरविण्यात आले. सदर यादी वेळोवेळी शासनाने दिलेल्या आदेशानुसार पाठविण्यात आली.शासनाच्या वतीने लाभार्थी शेतकऱ्याची मंजुर यादीत फक्त २४ लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. त्यामुळे उर्वरीत १८२२ लाभार्थी शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत चौकशी केली असता बल्लारपूर,राजुरा,वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जमा झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. मग मुल तालुका अनुदानापासून वंचित का ? शासनाचे वेळकाढू धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्याचे मनोबल वाढावे व आर्थिक दृष्टया सक्षम होण्याच्या दृष्टीने शासनाने शेतकऱ्याचा अंत न बघता त्वरीत प्रोत्साहन रक्कम बँक खात्यात जमा केल्यास कुंटूबाला आधार मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
संदीप कारमवार , अध्यक्ष विविध कार्यकारी सहकारी संस्था मूल : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी शासनाच्या आदेशानुसारच पाठविण्यात आली. मात्र बोटावर मोजण्याइतके लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे. या संदर्भात नागपुर येथील अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले गेल होते व नुकतेच चंद्रपूरचे जिल्हा उपनिबंधक यांना देखील पत्र दिले आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना त्वरीत लाभ मिळावा यासाठी शासनाने पाठपुरावा सुरू आहे.