News34 chandrapur
चंद्रपूर : तत्कालीन युती शासनाच्या काळात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम मंजूर करून सुरू केले. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या कामासाठी निधीची तरतूद न केल्याने हे काम रखडले होते.
आता पुन्हा युती शासन आल्यामुळे रखडलेल्या या कामाला गतीदेण्यासाठी येत्या चार महिन्यात बाबुपेठ उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
Sudhir mungantiwar
राष्ट्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार परिषद नवी दिल्ली चे सदस्य अजय दुबे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे पॅसेंजर एमिनीटिज कमेटी (PAC) रेल्वे मंत्रालय नवी दिल्ली ने चंद्रपूरला भेट दिली. त्या समितीतील डॉ. राजेंद्रजी फडके जलगांव,कैलास वर्मा मुंबई, विभा अवस्थी रायपुर,अभिजित दास कोलकाता या सदस्यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानक, चंद्रपूर रेल्वे स्थानक व बाबुपेठ उड्डाणपुलाला भेट दिली. त्यानंतर या सर्व सदस्यांनी मुनगंटीवार यांच्यासमेवेत बैठक घेत या सर्व ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी उच्चस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी भेटीनंतर सांगितले.
Babupeth railway flyover
गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या सुविधा व स्वच्छता या विषयावर गंभीरपणे काम करीत आहे. चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने याठिकाणच्या सर्व सुविधा या अद्ययावत असाव्या हा मुनगंटीवार यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. त्याचाच परिणाम म्हणून चंद्रपूर व बल्लारशाह या दोन्ही रेल्वे स्थानकांना देशात सर्वात सुंदर व स्वच्छ स्थानकाचा काही वर्षा पूर्वी पारितोषिक मिळाले आहे. यातच विकासाचा एक भाग म्हणून बाबुपेठ उड्डाणपूल अतिशय महत्वाचा आहे हे मुनगंटीवार यांच्या लक्षात आले. हा पूल लवकरात लवकर व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांना यश येत उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. हे काम प्रगतीपथावर होते होते; परंतु मध्यंतरीच्या काळात सरकार बदलले व काम मंदावले. आता पुन्हा एकदा युती शासन आल्यावर कामाला गती प्राप्त झाली आहे. पुढील दोन महिन्यात रेल्वे विभागाने आपले काम पूर्ण करावे व त्यानंतरच्या पुढील दोन महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले काम पूर्ण करून लोकार्पणासाठी उड्डाणपूल तयार करावा, असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले.
Babupeth news
याप्रसंगी राष्ट्रीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार परिषद नवी दिल्ली चे सदस्य अजय दुबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गाडेगोणे, मध्य रेलवे नागपुर चे एडीआरएम प्रफुल्ल खैरकर, सीनी.डीसीएम कृष्णार्थ पाटील,कार्यकारी अभियंता टांगले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, जिल्हा महासचिव नामदेव डाहुले,महानगर महासचिव ब्रिजभूषण पाझारे, भाजपाचे जिल्हा व शहराचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
