News34 chandrapur
चंद्रपूर - ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या जवळच्या व्यक्तीचे आज दुःखद निधन झाले.
हंसराज अहिर यांचे लहान भाऊ हितेंद्र अहिर यांना आज सकाळी राहत्या घरी हृदय विकाराच्या झटका आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
हितेंद्र अहिर यांच्या अचानक जाण्यामुळे अहिर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
