News34 chandrapur
चंद्रपूर/विरुर - छत्तीसगड राज्यातून दुपारी 12 वाजता धनी ट्रॅव्हल्स 35 प्रवासी सोबत घेत हैद्राबाद ला निघाली होती. Private Travel Accidents
शनिवारी 28 जानेवारीला पहाटे 3 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर-धानोरा-शिरपूर मार्गावर होती, अचानक वाटेत वळण आले, वाहन चालकाने शिताफीने वेग कमी करीत बस ला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र बस पलटी झाली.
या अपघातात एका प्रवाश्याचा मृत्यू झाला तर 23 प्रवासी जखमी झाले आहे. Big accident in chandrapur
हैद्राबाद राज्यात अनेक मजूर कामासाठी जात असतात, अनेक मजूर हे छत्तीसगड, मध्यप्रदेश व काही प्रमाणात महाराष्ट्र राज्यातून जात असतात.
खाजगी प्रवासी धनी ट्रॅव्हल्स ही 27 जानेवारीला छत्तीसगड वरून निघाली होती. Chandrapur breaking news
अपघात झाला त्यावेळी 35 प्रवासी होते, या अपघातामध्ये 35 वर्षीय चेतन समर्थदास रात्रे नवगड, छत्तीसगड राज्यातील रहिवासी याचा बसखाली दबुन मृत्यू झाला.
तर अन्य 23 प्रवासी जखमी झाले, किरकोळ जखमी विरुर ग्रामीण रुग्णालयात तर अन्य राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.
पहाटे घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच विरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल हे वरिष्ठांना सूचना देत घटनास्थळी पोहचले व पहाटे यंत्रणेला कामाला लावत जखमी प्रवाश्यांना बस च्या बाहेर काढत रुग्णालयात नेले.
इतर राज्यात प्रवास करणारे खाजगी बस चालक महामार्गाचा वापर न करता शॉर्टकट्स च्या माध्यमातून जलद पोहचता यावे हा प्रयत्न करतात, मात्र गावातून प्रवास करताना वाहन चालक छोट्या रस्त्याच्या वापर करतात त्यामुळे हे अपघात घडत असतात.
या अपघातामध्ये सुद्धा हेच झाले, चंद्रपूर वरून हैद्राबाद महामार्गाचा वापर बस चालकाने केला नाही कारण महाराष्ट्र व तेलंगाणा राज्यातील एन्ट्री पॉईंट ओलांडून यांना जावं लागत होते मात्र तसे न करता पैसे व वेळ वाचविण्यासाठी हा खटाटोप झाला त्यामुळे प्रवाश्यांच्या जीवावर हा शॉर्टकट् उठला.
पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या सतर्कतेने वेळेवर जखमींना उपचार मिळाले.
सकाळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी घटनास्थळी भेट देत जखमींची विचारपूस केली.