News34 chandrapur गुरू गुरनुले
मूल : तालुक्यातील नागपूर मार्गावरील चितेगांव लगत सापडलेल्या बनावट दारू कारखान्यात चंद्रपूर येथील एका दारू विक्रेत्याची भागीदारी असुन जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या आशिर्वादाने हा जीवघेणा दारू कारखाना सुरू होता. त्यामूळे सदर प्रकरणातुन त्या दारू विक्रेत्याला बाहेर काढण्यासाठी जोरदार फिल्डींग लावल्या जात असल्याची चर्चा आहे. Duplicate liquor
मूल नागपूर राज्य मार्गावर असलेल्या चितेगांव लगत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारू तयार करण्याचा अवैद्य कारखान्यावर धाड टाकुन जवळपास १७ लाखाचा ऐवज हस्तगत केला. ज्या कोणी व्यक्तींनी बनावट दारू तयार करतांना प्रवरा डिस्टीलर प्रवरानगर या मोठ्या दारू उत्पादकाचा नांवाचा गैरवापर करण्याचे धाडस केले, त्यावरून सदर अवैद्य व्यवसायात मोठ्या व्यक्तीचा सहभाग नक्कीच असावा. अशी चर्चा रंगु लागली. Spirit
वैद्यकीय व्यवसायात बनावट देशी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा स्पीरीट इतक्या मोठ्या प्रमाणात सापडल्याने तपास यंञणेसोबतच अनेकांना धक्का बसला. शाळा, काँलेजच्या प्रयोगशाळेत वापरला जाणारा स्पीरीट वैद्यकीय व्यवसायीही थोड्या बहुत प्रमाणात नियमित वापरतात. परवानगी विना स्पीरीट वापरणे बेकायदेशीर असतांना चितेगांव लगतच्या बनावट दारू कारखान्यात हजारो लिटर स्पीरीट आला कसा ? इतक्या मोठ्या प्रमाणांत स्पीरीट कोणी उपलब्ध करून दिला ? ज्वलनशील द्रव्य म्हणुन ओडखला जाणारा हजारो लिटर स्पीरीट कोणत्या वाहणाने आणण्यात आला ? असे अनेक प्रश्न तपास यंञणे सोबतच नागरीकांनाही पडला आहे. बनावट दारू कारखाना चालविणा-याचा शोध घेत असतांना तपास यंञणेने स्पीरीट पुरवठा करणाऱ्या कंपनीचाही शोध घेतल्यास बनावट दारू निर्माते आपसुकच उजेडात येतील. असा विश्वास नागरीक व्यक्त करताना दिसत आहे. fake liquor factory
सदर घटनेत उत्पादन शुल्क विभागाला ज्या जागेत बनावट दारु कारखाना सापडला ती जागा वादग्रस्त आहे. एका माजी सैनिकाला शासनाकडुन वाटपात मिळालेली सदर जागा अरूणा मरसकोल्हे हीने खोटे कारण सांगुन त्यांचे कडुन लिहुन घेतली असुन त्या जागेवर निर्माण केलेल्या गोट फार्म शेळी प्रशिक्षण केंद्रासाठी बँकेकडुन लाखो रूपयाचे कर्ज घेतल्याने बनावट दारू कारखाना सापडलेली जागा बँकेकडे गहाण आहे. परंतु तपासाची कार्यवाही करताना उत्पादन शुल्क विभागाने जागेच्या मालकासह ज्यांच्या नांवाने घटनास्थळी पार्सलचे खोके आढळुन आले त्या पवन वर्मा आणि शाम मडावी यांचे विरूध्द कारवाई चालविली आहे. हे जरी खरं असले तरी या सर्व बनावटीच्या उपदव्यापात जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा आशिर्वाद प्राप्त असलेला चंद्रपूर येथील एक दारू विक्रेता सहभागी असल्याची चर्चा आहे. घटनेतील पवन वर्मा नामक व्यक्ती विरूध्द उत्पादन शुल्क विभागाने यापुर्वीही गुन्हा दाखल असुन शाम मडावी हा वर्मा यांचा नोकर आहे. सध्या वर्मा आणि मडावी दोघेही अज्ञातवासात असले तरी कारखान्याचे खरे सुञधार अजुनही मोकाट असल्याची चर्चा आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याच्या मध्यस्थीने सदर प्रकरणातुन अलीप्त राहण्यासाठी तो दारू विक्रेता धडपड करीत असुन यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता अनेकजण वर्तवित आहेत. दुसरीकडे उत्पादन शुल्क विभागाने जेव्हा या बनावट दारूच्या कारखान्यावर धाड टाकली त्यावेळेस त्याठिकाणी एकही व्यक्ती सापडला नाही. लाखोची गुंतवणुक करून लाखोच्या अपेक्षेने जेव्हा सदर गोरखधंदा धाडसाने केला जातो, त्यावेळेस त्याच्या देखरेखी करीता किमान एक तरी व्यक्ती घटनास्थळी असायला पाहीजे होता. पण असा एकही व्यक्ती त्याठिकाणी आढळुन आलेला नाही. त्यामुळे जनतेत धाडसञाविषयी शंका व्यक्त केल्या जात आहे.