News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल- महाराष्ट्राचे दुसरे व विदर्भातील पहिले मुख्यमंत्री स्व. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती निमित्य मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कांग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश रत्नावार, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक, माजी अध्यक्ष राजेंद्र कन्नमवार यांचे हस्ते स्व.मा.सा. कन्नमवार यांच्या प्रतिमेला मालार्पण करुन अभिवादन केले. तसेच कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही स्व.दादासाहेब कन्नमवार यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन व प्रार्थना केली.
याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माजी नगरसेवक ,व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष गुरु गुरनुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, आदर्श सहकारी खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे ,विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेस सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप मोहबे, अन्वर शेख, विष्णू सादमवार यांचेसह ग्रामीण व शहरी कांग्रेस कार्यकर्ते कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते. संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले.