News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मूल शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर चंद्रपूर हायवे मुख्य मार्गावर असलेल्या नागाळा स्टॉप जवळ दुचाकी आणि ट्रक च्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान घडली. मनोहर दसरु मंचलवार वय (60) राहणार मामला बोर्डा व प्रवीण श्रावण मंचलवार वय (28) रा. मसाळा ता. चंद्रपूर असे अपघातात मृतकाचे नाव आहे. Road accident in chandrapur
मनोहर दसरू मंचलवार आणि प्रवीण श्रावण मंचलवार हे दोघे जण प्रविण साठी लग्नाकरिता मुलगी बघण्यासाठी आपल्या दुचाकी वाहनाने जात होते. चंद्रपूर मूल मार्गे जात असताना नागाळा जवळ मागच्या बाजूने भरधाव वेगाने येत असणाऱ्या एका ट्रॅक ने दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मृतकाना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदना करीता आणले. पुढील तपास मुल पोलीस करीत आहे. शुभ कार्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीवर दुःखाचा प्रसंग कोसळल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.