News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात सॅमसंग कंपनीच्या मोबाईल चा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. Mobile blast in chandrapur
भाऊराव आस्वले यांनी 4 वर्षांपूर्वी सॅमसंग कंपनीचा मोबाईल विकत घेतला होता, 2 दिवसांपूर्वी भाऊराव यांच्या खिश्यात असलेला मोबाईल अचानक गरम होत त्यामधून धूर निघू लागला, हाताला गरम वाटू लागल्याने त्यांनी तो मोबाईल बाहेर काढत फेकला असता त्याचा स्फोट झाला. Samsung mobile explosion
या घटनेत धूर व आगीमुळे आस्वले यांची पॅन्ट जळून मांडीला ईजा झाली आहे. मोबाईल गरम होत झालेल्या स्फोटामागे नेमके कारण काय याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अचानक झालेल्या या प्रकाराने भाऊराव अस्वले यांना धक्का बसलाय.