News34 chandrapur
चंद्रपूर - हिंग्लज भवानी वार्ड चंद्रपूर निवासी वेकोली कर्मचाऱ्याने नांदगाव खाणीजवळ असलेल्या वर्क शॉप परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मागील 2 दिवसापासून वेकोली कर्मचारी घरून बेपत्ता होता. Wcl employee suicide
59 वर्षीय दिवाकर तुकाराम जेंगरे हा चंद्रपुरातील वेकोली क्षेत्रात कार्यरत होता, मात्र 2 दिवसापासून ड्युटीवर जातो म्हणून घरून निघून गेला होता, जेंगरे घरी न परतल्याने कुटुंबियाने याबाबत बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. Chandrapur wcl employee
आज 29 जानेवारीला नांदगाव खाणी मधील वर्क शॉप जवळील झुडपात दिवाकर जेंगरे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे दिवाकर हे 31 जानेवारीला वेकोली मधून सेवानिवृत्त होणार होते, पण त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे कारण मात्र अज्ञात राहील.
याआधी CBI कारवाईत अडकलेल्या एका अधिकाऱ्याने सुद्धा गळफास घेत आत्महत्या केली, त्या अधिकाऱ्याचे मृतदेह नेण्याकरिता रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती मात्र आजच्या आत्महत्या घटनेतील मृतक दिवाकर जेंगरे यांचा मृतदेह नेण्यासाठी चक्क ट्रक चा वापर करण्यात आला, अधिकारी व कर्मचारी याबाबत वेकोलीने हा दुटप्पीपणा दाखविला आहे.
जेंगरे यांनी आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही, पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
