News34 chandrapur गुरू गुरनुले
मूल - मुल शहरात नव्यानेच होत असलेल्या बस स्थानकाच्या अगदी गेट समोर खाजगी ट्रॅव्हल्स व इतर प्रवासी वाहने लावली जात असल्याने या बस स्थानकावर खाजगी वाहनधारकानी कब्जा निर्माण केला काय? असा प्रश्न आता नगरात चर्चिला जात आहे. Bus station
बस स्थानकापासून १०० मीटर दूरवर खाजगी वाहने ठेवण्याचा नियम असला तरी, मूल येथे खाजगी वाहनधारकांवर कोणाचेही नियंत्रण राहीले नसल्याने आता थेट बस स्थानकाच्या गेट समोर खाजगी वाहने लावून बस स्थानकांमधून प्रवाशाची उचल करीत असल्याचे प्रकार सर्रास राज रोसपणे घडत आहे. यावर वाहतूक नियंत्रकांचे आणि वाहतूक पोलीस विभागाचे कुठलेही नियंत्रण दिसत नसल्याने इतर वाहतूकदारांना किंवा पायी चालणाऱ्या देखील अडचणीचे ठरत आहे. Mul bus depot
प्रसंगी कदाचित भविष्यात मोठ्या अपघाताला निमंत्रण ठरु शकते अशीही चर्चा केली जात आहे.
मुल येथे नवीन बस स्थानकाचे काम गतीने पूर्ण होत आहे. जुने गेट बंद करून नवीन गेट सुरू करण्यात आले आहे. या गेट समोरील डिव्हायडर देखील तोडण्यात आलेले आहे. येथून वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास होत असतानाच, या बस स्थानकाच्या गेट समोरच बस स्थानकाचे व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसऊन खाजगी वाहनाने ताबा केल्याने एसटी महामंडळाच्या बसेसना बस स्थानकावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. Chandrapur news
खाजगी ट्रॅव्हल्स, ऑटो, काळी पिवळी धारकाकडून प्रवाशासाठी होणारी कसरत, बसेस, ऑटो आणि दुचाकी वाहने यांची होणारे गर्दी यामुळे या परिसरा आता अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसा हा मुख्य रहदारीचा हायवे मार्गच असल्याने पर राज्यातून आणि विभागातून, जिल्ह्यातून जाणाऱ्या येणाऱ्या मुख्य वाहतूकीलाही दुसरा कोणताच मार्ग नसून हाच एकमेव मार्ग आहे. याच मार्गावरून अनेक बसेस, मोठी लोडेड ट्रक ,इतरही प्रायव्हेट चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात सारखी धावत असतात. त्यामुळे नेमके याच ठिकाणी मोठी वर्दळ असते. तसेच बसस्थानकासमोर अत्यावश्यक छोटी दुकाने आहेत त्यामध्येही ग्राहकांची सारखी गर्दी असतेच अशा ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण महत्वाचे ठरत आहे.