News 34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - दळण वळणाची वाहतुकीची देखभाल करता करता एक सामाजिक मूल्य जोपासत आणि माणुसकीचा धर्म जोपासण्याचा उदात्त हेतूने आज दि.१७ जानेवारी २०२३ ला सकाळी १० वाजता पासून महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत मुख्य रहदारीच्या मार्गावर असलेल्या आरंभा टोल प्लाझा इसिए इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रा.ली. पोलिस स्टेशन समूद्रपुर व महामागॆ पोलिस केंन्द्र जाम जि.वधाॆ यांच्या संयुक्त विधमाने रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले. Blood camp
रक्तदान शिबिराची सुरवात रेन्बो ब्लड बॅकेचे डाॅ.शिवाजी भोसले,विलास कुबडे,महामागॆ पोलिस केंन्द्र जामचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.स्नेहल राऊत,पोलीस उपनिरीक्षक श्री.देवेन्द्र पटले यांचे स्वागत इसीए इन्फ्रास्ट्रक्चर इं.प्रा.ली.आरंभा टोल चे प्राेजेक्ट कोआॅरडीनेटर श्री.अजय महादुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
रक्तदान हेच अमूल्य असे जीवनदान आहे. म्हणून आयोजित रक्तदान शिबिराला २५ रक्तदात्यांचे रक्तदान करुन आपले अमूल्य असे योगदान दिले. रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने डाॅ.राज दासानी,श्याम चौधरी, ऋषि कारोंडे, हेड.काॅ. येलने, डोंगरे, तिवारी, शिपाई वैध,सुरेंन्द्र जैन,आकाश वाकेकर, सतिश कापसे,अमोल वंजारे,पंकज गंथाडे,विरेंद्र राऊत, चेतन चापेकर,अनिल तळवेकर ऊपस्थित होते.
रेन्बो ब्लड बॅंक नागपूर चे मेघा भिवनकर, शितल घागरे,निता गोंडाने,अंकित वाटाने यांनी सहकार्य केले.