News34 chandrapur
चंद्रपूर/नागपूर - मागील 2 टर्म पासून शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे आमदार नागो गाणार यांच्यासाठी सध्याची निवडणूक सोपी नसल्याचे बोलल्या जात आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावर आता निवडणूक अधिकच रंगतदार मार्गावर आली आहे. Teachers' Constituency elections 2023
शिवसेनेचे उमेदवार नाकाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्ष श्रेष्ठीच्या आदेशाचे पालन करीत मागे घेतला, मात्र राष्ट्रवादी कांग्रेसचे इटकेलवार यांनी पक्षाचे आदेश जुमानत अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेसने इटकेलवार यांची पक्षातून हकालपट्टी केली.
भाजपचे नागो गाणार यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी समर्थीत विदर्भ माध्यमिक शिक्षक विभागाचे उमेदवार सुधाकर आडबाले यांच्याशी लढत होणार आहे. Mahavikas aghadi
सध्या या मतदारसंघात एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. सुरुवातीला नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार न उतरविण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. मात्र, त्यामुळे नागपुरात काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला. शिक्षक भारतीचे झाडे आणि अडबाले यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते इटकेलवार यांनीही अर्ज दाखल केला होता. मविआतच चार दावेदार झाल्याने एकजूट दाखविण्यात नेते कमी पडले. एकाने माघार घेतली असली तरी तिघे मैदानात कायम असल्याने मतविभाजनात फायदा भाजपलाच होण्याची शक्यता आहे.