News34 chandrapur
चंद्रपूर - 26 जानेवारीला चंद्रपुरातील मातोश्री वृद्धाश्रमाला 25 वर्षे पूर्ण झाले, रौप्य महोत्सव निमित्त वृद्धाश्रमाला सढळ हाताने मदत करणाऱ्याचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. DCM Devendra Fadanvis
कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.
भाजप - शिवसेना युतीच्या काळात वर्ष 1996 ला सुरु झालेल्या मातोश्री वृद्धाश्रमाला 3 वर्षे अनुदान होते मात्र सरकार बदलल्यावर कांग्रेस सरकारने अनुदान बंद केले, बिकट परिस्थिती असताना संस्था अध्यक्ष माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी वृद्धाश्रम बंद करण्याचा निर्णय घेतला मात्र सहकाऱ्यांनी हे वृद्धाश्रम चालवू असा निर्धार केला.
तब्बल 25 वर्षे नागरिकांच्या सहकार्याने मातोश्री अविरत सुरू राहली.
महाविकास आघाडी सरकार आल्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मातोश्री वृद्धाश्रमाचे अनुदान पूर्वरत सुरू केले. Devendra fadanvis in matoshri
रौप्य महोत्सवी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्याने फार बोलले नाही त्यांनी चंद्रपुरातील मातोश्री वृद्धाश्रमाचे कार्य उल्लेखनीय आहे. या वृद्धाश्रमाला सीएसआर निधीतून आर्थिक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून कोणताही आधार नसणाऱ्यांना वृद्धाश्रमासारखा उपक्रम मोठा सहाय्यभूत ठरतो, , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाषण संपल्यानंतर वृद्धाश्रमात असलेल्या वृद्धांच्या मध्ये जाण्याचा मोह फडणवीस यांना आवरला नाही, त्यांनी तात्काळ मंचावरून खाली उतरत सर्व वृद्धांचा आशीर्वाद घेत सदर अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद केला.