News34 chandrapur
चंद्रपूर - नागपूर विभागीय मतदार संघातील निवडणूक आता चुरशीची होत असून, भाजप व महाविकास आघाडी मधील नेत्यांनी आपला उमेदवार निवडून यावा यासाठी कंबर कसली आहे. nagpur teacher assembly
यंदाच्या निवडणुकीत यावेळी सुद्धा प्रस्थापित पक्ष्यांचे व अनेक संघटना समर्थीत उमेदवार उभे आहे, आप पक्ष पहिल्यांदा ही निवडणूक लढवीत आहे.
देवेंद्र वानखेडे हे उच्च शिक्षित असून त्यांनी MPED मध्ये सुवर्णपदक सुद्धा प्राप्त केले आहे.
आज चंद्रपुरात वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करीत निवडून आल्यास शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवू असे जाहीर केले.
Nagpur election 2023
शिक्षकांची बंद झालेली जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सतत प्रयत्न करणार, सध्या राज्यात शिक्षणावरील बजेट 3 टक्के कमी केले, शाळा कॉलेजमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्नशील, अनुदानापासून वंचित शाळा कॉलेजला अनुदान सुरू करणार, शिक्षकांना सर्व्ह, निवडणूक कार्ड वाटप, खिचडी वाटप इत्यादी गैर शैक्षणिक कार्यापासून मुक्तता मिळवून देणार हे सर्व प्रश्न सरकारपुढे लावून धरणार असल्याचे मत वानखेडे यांनी यावेळी व्यक्त केले.
दिल्ली च्या धर्तीवर राज्यातील शिक्षण सत्रात महत्वाचे बदल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Aam aadmi party
विद्यमान आमदार नागो गाणार यांनी 2 टर्म मध्ये शिक्षकांना फक्त टोपी लावण्याचे काम करीत जुनी पेंशन चालू करण्याचे आमिष दिले, मात्र ते आमिषच ठरले, आजही जुनी पेंशन संबंधी गाणार यांनी विधानसभेत आवाजही उचलला नाही, असा आरोप आप चे उमेदवार डॉ. देवेंद्र वानखेडे यांनी लावला.
देवेंद्र वानखेडे हे बलाढ्य पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध लढत असून त्यांच्या पुढे भाजप पक्षाचे नागो गाणार व महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांचं आव्हान आहे.
नागपूर विभागीय मतदार संघातील 39 हजार शिक्षक उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे.
