News34 chandrapur
चंद्रपूर - लहान बालके, मुले व अबाल वृद्धांचा आवडता एक छंद म्हणजेच पतंगबाजी, मात्र हा छंद आता जीवघेणा ठरत आहे.
यावर तोडगा म्हणून चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.
नायलॉन मांजामुळे अनेक मानवी व पक्ष्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे, व आजही अश्या घटना वारंवार घडत आहे. Chinese nylon manja
नायलॉन मांजावर बंदी असताना सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात छुप्या पद्धतीने मांजाची विक्री सुरू आहे, याविरोधात प्रशासन अनेक मोहीम राबविते त्यानंतर सुद्धा हा अवैध धंदा सुरूच आहे.
सध्या शालेय विद्यार्थी दुचाकी/सायकलने प्रवास करीत शाळा महाविद्यालयात जातात मात्र त्या मार्गावर नायलॉन मांजा केव्हाही आपल्या पाल्यांचा गळ्यात अडकू शकतो यासाठी आता पालकांना नजर ठेवण्याची गरज आहे.
आपले पाल्य पतंग उडविण्यासाठी मांजा कुठून खरेदी करतात यावर लक्ष ठेवत त्याबाबत 112 या पोलीस नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर सम्पर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक परदेशी यांनी केले आहे. kite flying festival
जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात चायनीज नायलॉन मांजामुळे अनेक मानवी व पक्ष्यांच्या जीवितेला धोका पोहचविणाऱ्या घटना घडतात यामुळे पालकांनी आपल्या मुलांना चायनिज मांजा वापरणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यायला लावण्याची आज गरज आहे.
ह्या जीवघेणा मांजा रस्त्यावर जात असताना केव्हाही आपल्या गळ्यात अडकू शकतो त्याबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.