News34 chandrapur
चंद्रपूर : शहराच्या मध्यभागी असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बगीचामध्ये शहरातील अबालवृद्ध विरंगुळा म्हणून येत असतात. महानगरपालिका प्रशासनाने हा बगीचा नुकताच विकसीत केला आहे. Chandrapur azad garden
त्यावर तब्बल ७ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. या बगीचाच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली प्रवेशासाठी २ जानेवारीपासून शुल्क घेतले जाणार आहे. मनपाकडून चंद्रपूरकरांना नवीन वर्षात ही भेट देण्यात आली आहे. यासर्व प्रकाराला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी विरोध दर्शविला आहे. Congress party
चंद्रपूर शहराच्या मध्यभागी ६ एकरात मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा आहे. या बगीचाची मालकी महापालिका प्रशासनाकडे आहे. मागील काही वर्षांपूर्वी या बगीचाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे बगीचाचे सौंदर्यीकरण, नूतनीकरण करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून बगीचाचे सौंदर्यीकरण, विकसित करण्यात आले. चंद्रपूरकर जनतेसाठी हा एकमेव बगीचा असल्याने दररोज सकाळ, संध्याकाळ येथे अबालवृद्ध मोठ्या संख्येने येत असतात. सोबतच ग्रामीण भागातून जिल्हास्थानी आलेले नागरिकही बगीचा बघण्यासाठी मोठी गर्दी करीत आहेत. परंतु, मनपा प्रशासनाकडून या बगीचाच्या देखभाल दुरुस्तीसाठी तरुण, वृद्धांकडून दहा रुपये, १२ वर्षांवरील मुलांकडून ५ रुपये प्रवेश शूल्क घेण्यात येणार आहे. सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. परंतु, हा प्रकार जनतेची लूट करणारा असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला आहे. New year 2023
---
चंद्रपूरकरांसाठी विरंगुळा म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद बगीचा हा एकमेव आहे. आता महापालिका प्रशासनाकडून बगीचा प्रवेशासाठी शूल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातून चंद्रपूरकरांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न मनपाने केला आहे. हे शूल्क तातडीने रद्द करण्यात यावे.
- रितेश (रामू) तिवारी,
जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर
