News34 chandrapur
ब्रह्मपुरी - एकीकडे नागरिक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहे मात्र दुसरीकडे पोटाची भूक भागविण्याकरिता नागरिक आजही शेतात कामासाठी गेले मात्र त्याठिकाणी असं काही घडलं की संपूर्ण ब्रह्मपुरी तालुका हादरुन गेला. Tiger attack news
वर्ष 2022 मध्ये मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला, 2022 मध्ये 50 च्या वर नागरिक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडले. Tiger attack in chandrapur
31 डिसेंबर ला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तोरगाव येथील 55 वर्षीय सीताबाई दादाजी सलामे शेतकामासाठी शेतात गेली असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने सीताबाई वर हल्ला चढविला. Year end
अचानक झालेल्या हल्ल्याने शेतातील नागरिकांनी धाव घेत आरडाओरडा केला वाघाला गावकऱ्यांनी पळून लावले मात्र सीताबाई चा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
सायंकाळी सीताबाई काम आटोपते घेत घरी जायला निघणार होती मात्र त्याआधी तिच्यावर काळाने झडप घातली.
घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीसांसह वनविभागाचे उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, क्षेत्र सहाय्यक मिलिंद सेमस्कर, वनरक्षक कागणे हे घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करीत आहेत.
