News34 chandrapur
चंद्रपूर - कामगार प्रामाणीक आणि कष्टकरी असतो. त्यांना भेटुन सामाजिक क्षेत्रात पुन्हा ताकतीने परिश्रम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे दरवर्षी नव्या वर्षाचे स्वागत कष्टीकरी समाजासोबत साजरा करण्याचा माझा प्रयत्न असते. यंदा हा दिवस आपल्या सोबत साजरा करता आला. याचा आनंद आहे.
आपल्या श्रमावरच भविष्यात शेकडो नागरिकांचे प्राण वाचविणारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची भव्य वास्तु उभी राहिली असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
Kishor jorgewar
आज रविवारी सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महविद्याल येथील कामगारांची भेट घेत नव नवर्षाचा पहिला दिवस त्यांच्या सोबत साजरा केला. यावेळी कामगारांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे सलिम शेख, राशेद हुसेन, विलास सोमलवार, प्रा. श्याम हेडाऊ, अॅड. परमहंस यादव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रोजेक्ट मॅनेजर ए.ए खोट, मचिंदर माने, विश्वनाथ शिंदे, मनिष प्रसाद, साईबाल सरकार, एम.डी अलाम, सुचित्रा राऊत, प्रफुल कांबळे, अजर आलम आदींची उपस्थिती होती.
Welcome 2k23
चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे दर वर्षी नव्या वर्षाची सुरवात कामगारांसोबत करतात. यापूर्वी त्यांनी वेकीलीच्या भुमीगत खदानीत पोहचून तेथील कर्मचार्यांसह नव वर्ष साजरा केला होता. तर मागच्या वर्षी त्यांनी सिएसटीपीएस येथील कामगारांसोबत नव वर्षाची सुरवात केली होती. यंदा त्यांनी पहाटेच निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहचुन येथे काम करत असलेल्या कामगारांसह नव वर्षाची सुरवात केली. येथे आमदार पोहचल्याने कामगार वर्गही उत्साही झाला. पोहचल्या नंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांना मिठाई आणि पुष्प देत नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.
Chandrapur medical college worker
कामगारांशिवाई विकासाची परिभाषा अपूर्ण आहे. कामगार थांबला कि विकास थांबतो. त्यामुळे कामगार क्षेत्राला न्याय देण्याचे काम आमच्या वतीने सुरु आहे. त्यांच्या मागण्या तात्काळ सुटाव्यात या दिशेने माझे नेहमी प्रयत्न राहिले आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालाचे बांधकाम अत्याधुनिक पध्दतीने केल्या जात आहे. येथे तयार होत असलेल्या चकचकीत इमारतींमध्ये कामगारांचा श्रमाचा मोठा वाटा आहे. असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. येथील कामगारांना सर्व सोयी सुविधा, सुरक्षा उपकरणे पुरविण्यात यावीत अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित अधिका-र्यांना केल्या आहे.
