News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही : चंद्रपूर ते नागपूर महामार्गावर सध्या हायवा ट्रक चालक तालुक्यातील रेतीघाट कडून सिंदेवाही शहरात सुसाट वेगाने येत असतात.
त्यांच्यावर कुणाचाच वचक नसल्याने हायवा ट्रक चालक मुजोरीने ट्रक चालवितात. एक महिन्यात परीसरातील गावा जवळ दोन अपघात सुसाट वेगाने रेती नेत असलेल्या हायवा ट्रक मुळे झाले. यामध्ये दोघांचा जीव गेला. या मार्गावर वाहनांना ब्रेक कोण लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिंदेवाही शहरातील शिवाजी चौकातुन सुसाट वेगाने हायवा ट्रक जात असतात. या ठिकाणीही अपघात होण्याची शक्यता आहे. Heavy vehicle

गौण खनिज हायवा ट्रक ने वाहतूक करतांना अर्धवट झाकलेले असल्याने हवेत उडून ग्रामस्थांच्या डोळ्यात रेती व गिट्टीची धुळ जात आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना, छोट्या वाहनचालकांना व पायी प्रवास करणाऱ्यांना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा व डंपरमुळे लहान मोठ्या शारिरिक इजा व अपघातांचा सामना करावा लागतो आहे. आरटीओने येथे फिरते पथक नेमून याची दखल घ्यावी अशी मागणी विद्यार्थां कडुन व शहरातील नागरिक तसेच गावातील ग्रामस्थांनी केली आहे. Chandrapur rto
सिंदेवाही बसस्थानकावरून शाळा, कॉलेजची मुले ये-जा करीत असतात. तसेच रस्ता ओलांडताना दुचाकी किंवा चारचाकी वाहनधारकांनाही धोका असतो. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या सुसाट वाहनांवर कारवाई संबंधित अधिकाऱ्याने करावे अशी मागणी केली जात आहे.