News34chandrapur
चंद्रपूर - अल्पवयीन असल्यानं गाडी चालवण्याचं लायसन्स मिळत नसलं तरी अशा मुलांचं गाडी चालवण्याचं प्रमाण वाढत आहे. या मुलांना टू-व्हीलर कशी चालवायची, याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसतं. बॅलन्स सांभाळता आला म्हणजे गाडी आली, असं समजलं जातं. वाहतुकीच्या नियमांची माहिती नसते. पण तरीही पालकांकडून त्यांना गाडी दिली जाते. मात्र अशा पद्धतीने मुलांना गाडी चालवण्यास देणं पालकांसाठी आता खूपच महाग पडणार आहे.
Juvenile driving
पालकांकडून लहान मुलांना वाहने चालविण्यास देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातांची भितीही व्यक्त करण्यात येत असते. नियमानुसार चालक १८ वर्षांचा झाल्याशिवाय वाहन चालवू शकत नाही. तसेच त्या व्यक्तीस परवानाही मिळत नसतो. असे असतानाही अनेक पालक मुलगा १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात मुलाला जाण्यासाठी वाहन घेऊन देत असतात. (Know the Juvenile driving rule under motor vehicle act)
मात्र आता यासर्व प्रकाराला चाप बसणार असून वाहतूक विभागाने अल्पवयीन वाहन चालकासाठी नवे कायदे लागू केले आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी चंद्रपूर वाहतूक नियंत्रक शाखा सज्ज झाली आहे, पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी वाहने देऊ नये अन्यथा कायद्याच्या चौकटीत सापडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा चंद्रपूर वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील यांनी दिला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात नव्या कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, त्यांनतर अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई मोहीम राबविण्यात येणार अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी न्युज ३४ सोबत बोलताना दिली. New traffic laws
वाहतूक विभागाचे नवे काय काय?
कोणी अल्पवयीन वाहन चालवताना पकडला गेला तर त्याच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते. जर एखादा अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना पकडला गेला तर त्याच्या पालकांना १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. यासोबतच त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. म्हणूनच, जर तुमचे मूल अल्पवयीन असेल आणि तुम्ही त्याला/तिला मोटार चालवायला दिल्यास, लगेच काळजी घ्या. पालकांनी आपल्या अपत्याला अल्पवयीन असताना वाहन चालवायला देऊ नये.
