प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळे निवडणुकांमध्ये आता बदलाचं वातावरण सुरू होणार आहे."
(Uddhav Thackeray)
"गेली अनेक वर्षे उपेक्षितांचं राजकारण अशी चळवळ अमलात आणण्याचा प्रयत्न आमचा होता. पण आमच्याच मित्र पक्षाने ही चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा प्रयत्न केला." सर्वांचा अंत होणार आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींचाही एक दिवस अंत होणार आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशीप संपवली," असंही आंबेडकर म्हणाले.
(Shivshakti and Bhimshakti)
मात्र या युतीचा चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणावर काय परिणाम होणार यावर आपण एक नजर टाकूया....
वर्ष २०१९ च्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांनी १ लाख १२ हजार ७९ मते घेत तिसऱ्या स्थानावर आले. चंद्रपूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे कट्टर कार्यकर्ते व बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग मोठा आहे.
लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर येथे ३३ हजार ७५९ मते, चंद्रपुरात २१ हजार ९८ मते, राजुरा २४ हजार ४८० तर वरोरा येथे ११ हजार ७८८ मते मिळविली होती.
त्यासोबत बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने ३९ हजार ९५८ मते मिळवली, चंद्रपूर मतदारसंघात १५ हजार ४०३, चिमूर मध्ये २४ हजार ४७४ मते प्राप्त केली.
वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ५० हजारांच्या वर मते मिळविली होती, महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा शिवसेनेला चांगलेच यश मिळाले आहे.
शिवसेना-वंचित आघाडीच्या नव्या युतीच्या समीकरणामुळे बलाढ्य पक्षाला भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
याबाबत चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शिवशक्ती-भीमशक्ती युतीचे स्वागत करीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. तसेच देश हा हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असून त्यासाठी भाजपला येणाऱ्या निवडणुकीत पराभूत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. संविधान वाचविणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून चंद्रपुरातील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना व वंचित आघाडी एकत्र येत राजकारणातील हि नवी ताकद बलाढ्य पक्षांना चित करणारी असेल असे सांगितले. political news
वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष भूषण फुसे यांनी बाळासाहेबांची वंचित आघाडी ची ताकद व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ राज्याने बघितला आहे, आज उद्धव ठाकरे यांच्या बाजूने नागरिकांच्या सहानुभूतीची लाट आहे.
भीमशक्ती व शिवशक्ती देशात अराजकता माजविणाऱ्या पक्षांना पुरून उरेल अशी प्रतिक्रिया देत आगामी चंद्रपूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांची ताकद विजयश्री रूपात दिसेलच असे सांगितले.
