News34 chandrapur
चंद्रपूर - हंसराज अहिर यांच्या माध्यमातून चंद्रपुर शहरातील युवकाने थेट दिल्ली भरारी घेत स्वीय सहायकाच्या महत्वपूर्ण पदाची जबाबदारी मिळवली आहे. Obc commission personal assistant
राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या स्विय सहायक पदी रवि चावरे यांची निवड झाली आहे. रवि चावरे हे ओबीसी प्रवर्गातीलच असून हंसराज अहीर यांचे अत्यंत विश्वासातील समजल्या जातात. अहीर केंद्रीय गृहराज्यमंत्री असतांना सुध्दा रवि चावरे यांनी स्विय सहायकाची जबाबदारी सांभाळली होती. Hansraj ahir
रवि चावरे यांचा चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी दांडगा जनसंपर्क असून अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधणे हे त्यांच्या जमेची बाजू आहे.
रवि चावरे यांच्या राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष स्विय सहायक पदी वर्णी लागल्याने सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
