News34 chandrapur
कोरपना/आवारपूर - एकीकडे जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारात घडलेल्या एका घटनेने जिल्हा हादरुन गेला. Search operation
3 मित्र 10 ते 12 वर्षे वयोगटातील अल्ट्राटेक सिमेंट कम्पनी परिसरातील कम्पनी निर्मित मिनी तलावात पोहायला गेली होती. Chandrapur big breaking news
मुले घरी न पोहचल्याने आई-वडिलांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, तिघांचा कुठं थांगपत्ता लागला नाही, अचानक एकाला त्या मिनी तलावाबाहेर तिघांचे कपडे आढळून आले आणि संपूर्ण कामगार व अधिकारी वर्ग त्या तलावाजवळ पोहचला. Shocking news in chandrapur
पोलिसही त्या ठिकाणी तात्काळ दाखल झाले, शोधमोहिम सुरू झाली, पण कुणाचाही पत्ता लागत नव्हता, बचाव पथकाला अंधार असल्याने अडचणी आल्याने मोहीम थांबविण्यात आली.
आज सकाळ पासून शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली असून आता चंद्रपुर जिल्हा प्रशासनाचे बचावपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी शोधमोहीम सुरू केली असता तिघांचे मृतदेह त्यांना मिळाले.
ते तिघेजण एकाच शाळेत व एकाच वर्गात शिकणारे आहे, 1 अधिकारी व 2 मुले कंपनी मधील कामगारांचे असल्याची माहिती आहे. Rescue operation
सुट्टीचा दिवस असल्याने तिघेजण तिथे पोहायला गेले होते, मात्र त्या मिनी तलावात चिखल जास्त असल्याने एकाचा पाय चिखलात फसला असता दोघांनी त्याला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली पण तिघेही त्यात अडकले व त्यांचा मृत्यू झाला.
ज्याप्रमाणे कंपनी प्रशासन कामगारांच्या सुरक्षेबाबत सतर्क असते पण त्याच आवारातील या मिनी तलावाजवळ एकही सुरक्षा रक्षक नसल्याने सदर घटना घडली असे बोलल्या जात आहे.
त्या परिसरात साधा सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा नाही, त्याठिकाणी अनेकदा वाघ आला असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे, पण अल्ट्राटेक कम्पनी च्या वतीने त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या नाही.