News34 chandrapur
नागभीड/चंद्रपूर - वर्ष 2022 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत वाढ झाली असून ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढत असून यामध्ये अनेक नागरिकांचा यामध्ये बळी गेला आहे. Tiger attack news
ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या नागभीड वनपरिक्षेत्रात एरव्हा टेकडी जवळ 45 वर्षीय निर्मला भोयर ही महिला शेतात काम करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्या महिलेवर हल्ला केला. Tiger attack in chandrapur
या हल्ल्यात निर्मला यांचा जागीच मृत्यू झाला, सध्या चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी, नागभीड व सिंदेवाही तालुक्यात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
मानव वन्यजीव संघर्षातील वर्षभरात हा 52 वा बळी असल्याची माहिती आहे.
वनविभागाने घटनेचा पंचनामा करीत पीडित कुटुंबाला सानुग्रह अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. Tiger attack in maharashtra
