News34 chandrapur
चंद्रपूर - नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 30 जानेवारीला मतदान तर 2 फेब्रुवारी 2023 ला मतमोजणी होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. Nagpur Division Teachers Constituency
जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विनय गौडा यांनी निवडणूक कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती देत महाराष्ट्र विधान परिषद नागपूर शिक्षक मतदार संघात वर्ष 2017 मध्ये 5 हजार 638 मतदार होते तर वर्ष 2022 मध्ये 1 हजार 822 मतदारांची भर पडली.
आता शिक्षक मतदार संघात एकूण 7 हजार 460 मतदार आहे. Maharashtra Legislative Council election 2023
सध्या शिक्षक विभाग मतदार संघात नागो गाणार आमदार आहे, त्यांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारी 2023 ला संपुष्टात येत आहे.
नागपूर विभागात एकूण 27 मतदान केंद्र आहे, 29 डिसेंम्बर पासून नागपूर विभाग सहित नाशिक, अमरावती, औरंगाबाद व कोकण विभागात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
