News34 chandrapur
चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यापासून महाराष्ट्रातील शेतकरी, कर्मचारी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता मागील ६ महिन्यापासून त्रस्त आहे. या काळात महापुरुषाचे अपमान संपूर्ण देश बघत आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती शिवराय, महात्मा फुले, सावित्री फुले यांचा अवमान करीत आहे. या घटना लज्यास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत चर्चेत भाग घेतांना केला.
Pratibha dhanorkar mla
महाराष्ट्रात होत असलेला अवमान थांबविण्यासाठी आणि सन्मान मिळवून देण्यासाठी महात्मा फुले, सावित्री फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रस्तावित होता. तो अद्याप मिळाला नाही. तो देण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात केली. यावेळी त्या म्हणाल्या की, २०१४ पूर्वी शाळेत शिकत असताना सागरा प्राण तळमळला ही कविता उत्साहाने म्हणत होतो, मात्र आज महापुरुषांचे होणारे अपमान बघून मागील ८ वर्षातील केंद्र सरकार जबाबदार आहे का, याचा विचार व्हावा. मागील ६ महिन्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय बिघडलेली आहे. चंद्रपूर व जिल्ह्यातील गांजा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात पोलिसांनी मोठी कामगिरी केली. अनेक आरोपीना जेरबंद केले. रेल्वेतून लहान बालकांची होणारी विक्री पोलिसांच्या सतर्कतेने उघडकीस आली. या बद्दल आमदार धानोरकर यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.
Nagpur winter session assembly 2022
पुढे त्यांनी सांगितले कि, मागील वर्षभरात विधानसभेत वरोरा येथे ४४ घटना, तर भद्रावती तालुक्यात ७ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. महिला अत्याचार आणि कौटूंबिक अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आमदार धानोरकर यांनी केली. सुमठाना येथे गर्भवती महिलेने पोटातील बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. महिलांना असे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे, याचा विचार व्हावा, याकडे लक्ष वेधले.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ३० टक्के महसूल राज्य सरकारला मिळतो. त्या निधीतून किती व्याघ्र प्रकल्पाचा विकास करण्यात आला. तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केलेल्या विचारणांचे उत्तर देखील देण्यास टाळाटाळ होत असून हि अक्षम्य बाब असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सभागृहात म्हटले. येथील सफारी बुकिंग मध्ये देखील प्रचंड घोळ असून त्याची चौकशी करावी तसेच सेवानिवृत्त मात्र कंत्राटी पद्धतीने कार्यरत गुंडावार यांच्या अरेरावी वागणुकीमुळे त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी सभागृहात केली. Tadoba tiger national park
