News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूरकरांना 200 युनिट विज मोफत द्या या मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आयोजित अधिकार बाईक रॅलीची अभुतपुर्व सुरवात झाली आहे. 200 unit
गंगुबाई जोरगेवार म्हनजेच अम्मा यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. जवळपास दोन ते अडिच हजार बाईक्स या रॅलीत सहभागी झाल्या असुन ही भव्य बाईक रॅली दुपारी 1 वाजताच्या दरम्यान नागपूर विधान भवनावर धडकणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्या हा विज उत्पादक जिल्हा आहे. कोळश्यावर आधारीत विज प्रकल्प येथे चालत असल्याने चंद्रपूरकरांना प्रदुषनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याच्या मोबदल्या स्वरुप चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत देण्यात यावी, शेतीसाठी विज मोफत देण्यात यावी, उद्योग वाढीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
या मागणीसाठी आयोजित अधिकार बाईक रॅलीला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सकाळी 8 वजाता या रॅलीला गांधी चौक येथुन सुरवात झाली असुन. ही भव्य रॅली नागपूर विधान भवनाच्या दिशेने रवाणा झाली आहे. या रॅलीत दोन ते अडिच हजार बाईक सह 100 चारचाकी वाहणे सहभागी झाले आहे. जवळपास पाच हजार लोक या रॅलीत उपस्थित असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. दुपारी 1 वाजताच्या दरम्यान ही रॅली नागपूर विधान भवनावर धडकणार आहे. त्यांनतर तेथे आमदार किशोर जोरगेवार रॅलीला संबोधीत करणार असल्याची माहिती आहे. Winter session 2022