News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर विधानसभेचे आमदार ह्यांनी 2019 ची निवडणूक जिंकण्या साठी संपूर्ण विधानसभेतील सर्व सामान्य जनतेला 200 युनिट मोफत मिळेल ह्याची वल्गना केली
आणि त्या साठी संपूर्ण विधानसभेत रॅली व भाषणे दिली
महाविकास आघाडी सरकार मध्ये पण आमदार साहेब ह्यांनी समर्थन दिले पण 200 युनिट जनतेला देऊ शकले नाही.
परंतु आता नवीन आलेल्या सरकार मध्ये आमदार साहेबांनी गुहाटी,पासून तर मुख्यमंत्री बनविण्या पर्यंत आमदार साहेबांनी साथ दिली, आमदार साहेबांच्या मते तर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांचे खूप खास आहे,आता चंद्रपूर मधील जनता 200 युनिट मिळेल ह्या कडे आमदार साहेबांकडे आशेने बघत आहे. Winter session nagpur
परंतु 200 युनिट तर दूर आमदार साहेबांनी आपल्या सोशल मीडिया वरून 200 युनिट चे सर्व व्हिडीओ डिलिट केले ह्याचा अर्थ जनतेनी काय काढावा? आणि हेच 200 युनिट जनतेला मोफत मिळावे ह्या साठी चंद्रपूर ते नागपूर अधिवेशनावर स्वतःच्या सरकार विरोधात अधिकार रॅली काढून चंद्रपूर मधील विधानसभेतील जनतेच्या डोळ्यात आमदार साहेब धूळ झोकण्याचा प्रयत्न करत आहे.
एकीकडे आपल्या सोशल मीडियावरून 200 युनिट चे व्हिडीओ डिलिट करण्यात आली आणि आता अधिकार रॅली काढत असल्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम येत आहे की आमदार साहेब जनतेला मूर्ख तर बनवत नाही.
आमदार साहेबांना व जनतेला 200 युनिट ची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात स्वाक्षरी अभियान घेतले आणि 200 युनिट मिळावे म्हणून शहरातील जणतेंनी स्वाक्षरी अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग सुद्धा घेतला. Ncp chandrapur
शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांचे आमदार साहेबाला एक मागणी आहे की जो पर्यंत 200 युनिट ची पूर्तता राज्य सरकार करत नाही तो पर्यंत चंद्रपूर मधील किमान दारिद्र्य रेषे खाली येणाऱ्या सर्व विधानसभेतील रहिवाशांना 200 युनिट चे वीज बिल आमदार साहेबांनी आपल्या स्वखर्चातून भरावे करावी, अन्यथा अधिकार रॅली चा खोटा दिखावा करणाऱ्या आमदार साहेबांनी ह्या हिवाळी अधिवेशनात 200 युनिट ठराव मंजूर न केल्यास चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धिक्कार रॅली काढून ही रॅली आमदार साहेबांच्या कार्यालयावर काढण्यात येईल व त्यांच्या कार्यालयावर विद्युत बिलाची होळी जाळण्यात येईल असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी प्रसिद्ध पत्रा द्वारे देण्यात आला.