News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपुर तालुक्यातील मसाळा(तू) येथील भोला खोब्रागडे यांच्या शेतात असलेल्या कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे.दरम्यान खोब्रागडे यांचे जवळपास 50 हजारांचे नुकसान झाले असून वनविभागाने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Leopard attack in chandrapur
मसाळा(तू) गावाला वेकोलीचे डम्पिंग लागून आहे. सोबतच ताडोबाचे जंगल लागून असल्यानं वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.तसेच शेतात जाऊन मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान करत आहे. दरम्यान रविवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या कुक्कुटपालन च्या शेड मध्ये घुसून कोंबड्या वर ताव मारला. Poultry farming
यात जवळपास 50 हजारांचे नुकसान झाले असून वनविभागाने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.