News34 chandrapur
नागपूर/चंद्रपूर - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राजकारणातून संन्यास घेण्याच्या विचारात आहे, असे विधान त्यांनी केल्यावर राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये एकच खळबळ उडाली. Ajit pawar
अजित पवार खरंच राजकारण सोडणार काय? अश्या चर्चा रंगू लागल्या मात्र त्यांचं हे विधान एका विनोदाचा भाग होता. Politics breaking
भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमासोबत बोलताना बारामती येथे मी केलेल्या दौऱ्याने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करीत, त्यांचा पराभव करणार अशी प्रतिक्रिया दिली होती. Chandrashekhar bavankule
त्यांच्या विधानाचा उल्लेख करीत अजित पवार यांनी मला रात्री झोप लागली नाही, भाजपच्या ताकदवर प्रदेश अध्यक्षाने माझा करेक्ट कार्यक्रम करू अशी प्रतिक्रिया दिल्यावर मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करीत आहो असा टोला लगावला.
2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव मुळे अपमानित होण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेतलेला बरं असे अजित पवार विनोदाने म्हणाले.