News34 chandrapur
चंद्रपूर - हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर व डेव्हलोपमेंट अँड रिसर्च एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी (ट्रीम) चंद्रपूरच्या वतीने कुणाल घोटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर हॉकी लीग चे आयोजन दिनांक 25 ते 27 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. Hocky tournament
या स्पर्धेत एकूण सहा संघाने सहभाग घेतला त्यामध्ये वीर मराठा संघ मालक विरु मून आणि राहुल देशपांडे, रायगड संघ मालक चरित्र नगराळे आणि मिलिंद तेलंग, सिहंगड संघ मालक सचिन राखुंडे आणि योगेश खडसान, शिवराय संघ मालक सागर रेड्डी, स्वराज संघ मालक संदीप वैरागडे, शिवनेरी संघ मालक अनिल ठाकरे होते.
या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले देवराव बेले तसेच प्रमुख पाहुणे चरित्र नगराळे, संदीप वैरागडे, सचिन राखुंडे, विरु मून, प्रभाकर टोगर, शुभंकुल रामटेके उपस्तित होते. तसेच आमचे मार्गदर्शक वरिष्ठ हॉकी खेळाडू अब्दुल रहमान, बबन शेख, मधुकर जुमडे, अज्जू बाबा, रमेश सिंग चव्हाण, बब्बूभाई शेख मोहम्मद, अशोक यादव प्रामुख्याने उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये प्रथम स्थान शिवराय या संघाने पटकावला त्यांनी चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये सिंहगड संघाला 04 विरुद्ध 01 गोल ने विजय मिळवत प्रथम थान प्राप्त केले. द्वितीय स्थानावर सिंहगड हा संघ राहिला आणि तृतीय स्थानावर स्वराज्य हा संघ राहिला. Chandrapur hocky league
या स्पर्धेचे बेस्ट डिफेंडर म्हणून अंकित लोखंडे आणि आर्यन भांडेकर यांचा सत्कार करण्यात आला, बेस्ट फॉरवर्ड म्हणून कृष्णा तालीवर आणि तुषार मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून निधी झाडे हिचा सत्कार करण्यात आला बेस्ट ऑप कमिंग प्लेयर म्हणून श्लोक मित्तल याचा सत्कार करण्यात आला तसेच स्पर्धेमध्ये एकूण 11 गोल नोंदवल्यामुळे सोनाली गावंडे हिचा बेस्ट स्कोरर म्हणून सत्कार करण्यात आला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केलामुळे बबलू खानकुरे याला उत्कृष्ट खेळाडूचा बहुमन मिळाला.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ड्रीम चंद्रपूरचे पदाधिकारी तसेच हॉकी डेव्हलपर असोसिएशन चंद्रपूरचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.