News34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र पोलीस नागपूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 30 डिसेंम्बरला विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आली आहे. Chandrapur police transfer
चंद्रपूर जिल्ह्यातील 4 पोलीस निरीक्षक, 5 सहायक पोलिस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या तर 2 बदली स्थगित करण्यात आल्या आहे. Chandrapur police station
तर नागपूर ग्रामीण, वर्धा व भंडारा येथून 4 पोलीस निरीक्षक, 3 सहायक पोलिस निरीक्षक तर 3 पोलीस उपनिरीक्षक चंद्रपूर जिल्ह्यात रुजू होणार आहे. Chandrapur police
यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून पोलीस निरीक्षक उमेश पाटील व प्रदीप शेवाळे यांची बदली नागपूर ग्रामीण, स्वप्नील धुळे यांची बदली भंडारा तर सत्यजित आमले यांची बदली वर्धा येथे झाली आहे. Transfers
सहायक पोलिस निरीक्षकांमध्ये सदाशिव ढाकणे वर्धा, अनिल आळंदे वर्धा, विनीत घागे वर्धा, संदीप कापडे वर्धा तर संतोष दरेकर यांची बदली वर्धा जिल्ह्यात करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक मध्ये दिलीप लोखंडे व अनिल मालेकर यांच्या बदलीला स्थगिती तर राजकुमार मडावी व किरण मेश्राम यांची बदली भंडारा जिल्ह्यात करण्यात आली आहे.
नागपूर ग्रामीण व भंडारा जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने रुजू होणारे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, अनिल जीट्टावार, मनोहर कोरेटी, शिवाजी कदम यांचा समावेश आहे.
वर्धा जिल्ह्यातून चंद्रपुरात येणारे सहायक पोलिस निरीक्षक म्हणून जितेंद्र चांदे, सचिन यादव व सपना निरंजने रुजू होणार आहे.
वर्धा व भंडारा जिल्ह्यातून चंद्रपुरात येणारे पोलीस उपनिरीक्षक म्हणून नंदकिशोर खेकाडे, पपिन रामटेके व रविंद्र रेवतकर यांचा समावेश आहे.
