News34 chandrapur
चंद्रपूर - नवीन वर्ष 2023 च्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात विविध भागात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी DJ नाईट्स चे आयोजन करण्यात आले असून त्याठिकाणी बेकायदेशीर कृत्य होऊ नये यावर चंद्रपूर पोलिसांची करडी नजर आहे.
New year celebration
सध्या जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी वाढली असून नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित तरुणाईच्या कार्यक्रमात अंमली पदार्थाचा वापर होऊ नये यासाठी पोलीस चहू बाजूने नजर ठेवून आहे. New year celebration 2023
शहरातील आतील व बाहेर, हॉटेल्स, लॉन अश्या ठिकाणी कपल्स साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र त्याठिकाणी मादक पदार्थांचे सेवन व तस्करी होऊ नये अश्या सूचना पोलिसांतर्फे आयोजकांना देण्यात आल्या असून जर कुठेही बेकायदेशीर कृत्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली तर आयोजकांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. Chandrapur police station
अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली आहे.
