News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - व्हॉईस ऑफ मीडियाची संघटनेची एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी नुकतीच संपन्न झाली.
Voice of media प्रख्यात साहीत्यीक प्रा. यशवंत मनोहर, आमदार संजय गायकवाड, स्वाभीमानीचे नेते रविकांत तुपकार, अर्थतज्ञ डाँ. नरेश बोडखे यांचेसह आपल्या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे, राज्य अध्यक्ष राजाभाऊ माने साहेब या दिग्गज मंडळीनी पञकार आणि पञकारीता या आपल्याशी निगडीत असलेल्या विषयावर सविस्तर व यथोचित मार्गदर्शन केले.

मान्यवरांच्या मार्गदर्शना सोबतच कार्यशाळेचे नियोजन आणि व्यवस्थेसंबंधी आम्ही सर्व भारावुन गेलो. आपल्या न्याय हक्कासाठी संघटनेचे काम याहुन अधिक नेटाने करावेच लागेल. असा निर्धार करून आम्ही परतीला निघालोत. विदर्भ अध्यक्ष आदरणिय मंगेशभाऊ खाटीक, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, नागपुर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर, गोंदीया जिल्हाध्यक्ष प्रमोद गुडधे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुदमवार, वर्धा जिल्हाध्यक्ष प्रमोद पानबुडे, वाशिम जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, आपले जिल्हा कार्याध्यक्ष गुरू गुरनुले, प्रवक्ता अमर बुध्दारपवार आदी उपस्थित होतो. कार्यशाळेत पञकार अपघात विमा, गृहनिर्माण संस्था, पञकार भवन, अधिस्विकृती, पञकारा संबंधी कायदे आदी बाबीवर कार्य करण्याचा संकल्प उपस्थित अडीचशेच्या वर पञकार बांधवांनी घेतला. चला तर मग आता आपणही संकल्प करू या, व्हाईस आँफ मिडीयाचे कार्ये आणि ध्येय पुर्तीसाठी सहभागी होवु या. असा अमूल्य संदेश कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिला.