News34 chandrapur
कोरपना - चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक महिन्यापासून मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना जोर पकडत असून आतापर्यंत 100 च्या वर हल्ले वन्यप्राण्यांनी केले. Wild animals
Leopard attack
Leopard attack
कोरपना तालुक्यातील बेलगाव येथे आत्राम कुटुंबाचे शेत आहे, सायंकाळची वेळ असल्याने लवकर शेतीचे कामे आटोपीत आत्राम कुटुंब घरी जाण्याच्या तयारीत होते. Chandrapur leopard
आत्राम यांचा 9 वर्षीय मुलगा नितीन याला भूक लागल्याने तो डबा घेण्यासाठी गेला असता अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करीत नितीन ला उचलत झुडपात फरफटत नेले.
त्यावेळी जवळच एका गुराख्याने आरडाओरडा केला मात्र तो पर्यंत बिबट्याने नितीन ची शिकार केली, बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय नितीन ला आपला जीव गमवावा लागला. Human Wildlife Conflict
नरभक्षक बिबट मागील अनेक दिवसांपासून कोरपना तालुक्यात अनेकांना दिसला होता, घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमू तात्काळ दाखल झाली होती, नागरिकांनी सतर्क रहावे अश्या सूचना करीत त्या बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन गावकऱ्यांना देण्यात आले.