News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या फिनिक्स साहित्य मंच चंद्रपूरचे साहित्य प्रतिभा व सेवावृत्ती पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले.
चंद्रपूरातील प्रतिथयश कवी-लेखकांच्या प्रथम सकस साहित्यकृतीला देण्यात येणारा फिनिक्स प्रतिभा पुरस्कार चंद्रपूरचे कवी सुरेश रामटेके यांच्या 'कॅक्टससल' या कवितासंग्रहास, आमडी येथील कवी प्रशांत भंडारे यांच्या 'कवडसा', तसेच जिवती येथील ॲड.सचिन मेकाले यांच्या 'तूच ठरव' कवितासंग्रहास व चंद्रपूर येथील ॲड.जयंत साळवे यांच्या 'मित्रा' या पत्रलेख संग्रहास पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. Literary and cultural sector
विधायक साहित्य चळवळीसाठी कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांना देण्यात येणारा फिनिक्स साहित्य सेवाव्रती सन्मान ब्रह्मपुरी येथील गणेश कुंभारे व गोंडपिपरी येथील दुशांत निमकर यांना जाहीर करण्यात आले आहे. Phoenix Literary Forum awards
१५ जानेवारी रोजी चंद्रपूरात कवी अरुण घोरपडे यांच्या 'चांगभलं' या अभंगसंग्रहाचे प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होईल, असे फिनिक्स साहित्य मंचातर्फे बी.सी.नगराळे, नरेशकुमार बोरीकर, विजय वाटेकर, धनंजय साळवे, धर्मेंद्र कन्नाके, सुरेंद्र इंगळे, गोपाल शिरपूरकर, सुधाकर कन्नाके, अविनाश पोईनकर, मिलेश साकुरकर, मीना बंडावार, शितल धर्मपुरीवार व सदस्यांनी कळवले आहे.