News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा 17 डिसेंबर रोजी वाढदिवस, आमदार जोरगेवार यांनी साधारण व्यक्तिमत्त्व ते आमदार पर्यंतच्या प्रवासात अनेक सामाजिक कार्य केले. Setu centre
त्यांना अनेक अडथळे राजकीय जीवनात आले मात्र न हरता व न थकता त्यांनी सामाजिक कार्य निरंतर सुरू ठेवले, त्याची फलश्रुती त्यांना नागरिकांनी आमदार बनवीत विधानसभेत एन्ट्री दिली. Mla kishor jorgewar
जेष्ठ नागरिक जे घरी एकटे असतात त्यांच्या मागेपुढे कुणी नाही त्यांचा मुलगा बनत स्वतः आपल्या विधानसभेत अम्मा का टिफिन ही सेवा सुरू केली, आज दररोज तब्बल 150 नागरिकांना घरपोच ही सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली.
आज त्यांनी वाढदिवसानिमित्त "कर्तव्य केंद्र" सुरू करण्याचा मानस ठेवला आहे, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध सेवा मोफत मिळाव्या हा कर्तव्य केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. Free public centre
सेतू केंद्रात ज्या सुविधा नागरिकांना मिळतात त्याच सुविधा आमदार जोरगेवार हे नागरिकांप्रति आपले कर्तव्य म्हणून मोफत उपलब्ध करीत आहे, शैक्षणिक किंवा असे अनेक प्रमानपत्राला लागणारे शुल्क स्वतः आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयामार्फत भरणार आहे.
या सुविधेचा आजपासून शुभारंभ होत आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, ही सेवा निरंतर नागरिकांच्या सेवेत सुरू राहणार आहे.