News34 chandrapur
गोंडपीपरी - एसटी बसचा चालक अती वेगाने गाडी चालवू लागला. तो मद्यप्राशन केला असल्याने प्रवासी घाबरलेत. वेग कमी ठेवण्याची विनंती केली. मात्र चालकाने ऐकलं नाही.एका दांपत्याने चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला.मात्र चालक त्यांच्याशी भांडू लागला. बसमधील एक विद्यार्थी चालकाच्या व्हिडिओ काढत होता. हे लक्षात येतात चालकाने थेट विद्यार्थ्याकडे धाव घेतली आणि त्याला मारहाण केली. हा प्रकार गोंडपिपरी धाबा मार्गावरील गोजोली येथे घडला.
Msrtc chandrapur
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी तालुक्याच स्थळ गाठतात. विद्यार्थी एसटी बसने प्रवास करतात. आज शाळा सुटल्यावर घरी परत येण्यासाठी विद्यार्थ्यांनी mh १४ bt १६७५ क्रमांकाची गोंडपिपरी राजुरा बस पकडली. गोंडपिपरी धाबा मार्गाचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी मार्ग खोदलेल्या अवस्थेत आहे. तर मार्गात हजारो खड्डे आहेत. अशा मार्गावरून बस चालक वेगाने गाडी चालवू लागला. याच्या त्रास प्रवाशांना झाला. प्रवाशांनी गाडी हळू चालवण्याची विनंती केली. मात्र चालक ऐकायला तयार नव्हता. गोजोली गावात बस थांबतातच धाबा गावातील विलास सिडाम, त्यांची पत्नी रेखा यांनी चालकाला परत विनंती केली. मात्र चालकाने त्यांच्याशी भांडण सुरू केले. त्यांचे हे भांडण गाडीत बसलेला धनराज कुकुडकर नावाचा विद्यार्थी मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत होता. Viral video चालकाच्या लक्षात येतात चालकाने त्याच्यावर धाव घेतली. त्याला मारहाण केली. त्यानतंर बस धाबा बसस्थानकावर थांबली. बस स्थानकाला लागूनच पोलीस स्टेशन आहे. सिडाम आनी विद्यार्थी पोलीस स्टेशनकडे जायला निघालेत. त्याच वेळी चालक गाडी घेऊन पुढे गेला. या प्रकाराने विद्यार्थी पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान त्या वाहनचालकावर निलंबनाची कारवाई करा अशी मागनी करत शिवसेना आक्रमक झाली.दि.(१७)शनिवारी गोंडपिपरी बस स्थानक प्रमुखांना निवेदन देऊन निलंबित करण्याची मागनी केली अन्यथा आंदोलनाचा ईशारा दिला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते,युवासेना शहर प्रमुख विवेक राणा व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.