News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पठाणपुरा गेट बाहेर उघड्यावर कचरा टाकलेल्या संबंधीत कॅटरर्स कडुन ५००० रुपयांचा दंड तर रस्त्यावर बांधकाम साहीत्य ठेवणाऱ्या ४ नागरिकांकडुन ६००० रुपयांचा दंड वसुल केला आहे. संबंधीतांकडुन दंड वसुल करून पुन्हा सदर कृती न करण्याची ताकीद देण्यात आली आहे. Chandrapur municipal corporation
वास्तविकतः दंड ठोठावणे नाही तर स्वच्छतेचे पालन व्हावे हा यामागचा हेतू आहे. स्वच्छता विभागामार्फत दररोज सकाळ संध्याकाळ झडाई करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र काही उपद्रवी तत्वांद्वारे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवणे हे प्रकार केले जातात. जर काही नागरिकांद्वारे असे प्रकार सुरु राहतील तर मनपाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना योग्य ती साथ मिळत नाही. Swachhta abhiyan
मनपाने घेतलेल्या शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेला नागरिकांनी भरभरून साथ दिली. अनेक चौकांची स्वच्छताच झाली नाही तर त्या जागा नियमित स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही त्या सहभागी संघांनी घेतली. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या स्वच्छता मोहीमेस केवळ काही नागरिकांच्या दुर्लक्षितेमुळे गालबोट लागु नये याची दक्षता घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
तसेच मनपा पथकांमार्फत नायलॉन मांजाला हद्दपार करण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून प्रत्येक दुकाने आस्थापनांची मनपाने गठीत केलेल्या पथकांमार्फत कसुन तपासणी करण्यात येत आहे. नायलॉन मांजाची विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे यापुर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.