News34 chandrapur
चंद्रपूर/ऑस्ट्रेलिया - 23 डिसेंबर रोजी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गुगल मीट वर संवाद साधून साजरा केला.
पर्यटन तसेच येथील आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि शेती व्यवस्था यांचा अभ्यास हे दुहेरी उद्देश घेऊन त्या सहकुटुंब ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत.
23 डिसेंबरला त्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा कशा द्यायच्या या विवंचनेत असलेल्या त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चक्क गुगल मीटवर त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या .
यावेळी डॉक्टर राकेश गावतुरे व डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी ऑस्ट्रेलियातील ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था व आरोग्यवस्था यावर सविस्तर माहिती चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिली, त्यावेळी डॉक्टर बोलले की ते ज्या ठिकाणी थांबलेले आहेत मूल अशा तालुक्या एवढ्या लोकसंख्येच्या डब्बो या शहरामध्ये.
एक मोठं 200 खाटांचे सरकारी रुग्णालय आहे जिथे सर्व प्रकारच्या स्पशालिटी सर्विसेस ज्यामध्ये अँजिओप्लास्टी पासून किडनी डायलिसिस ,कॅन्सर थेरपी ,रेडिओथेरपी आणि सर्व प्रकारचे स्पेशालिस्ट सुपर स्पेशालिस्ट सेवा देतात विशेष म्हणजे शहरामध्ये एकच प्रायव्हेट हॉस्पिटल आहे आणि तिथल्या सेवा ह्या मर्यादित आहे तिथे साधे ICU सुद्धा नाही.
दुर्गम भागांमधून गंभीर किंवा अर्जंट पेशंटला डब्बोला आणण्याकरिता तत्काळ विमानसेवा आणि हेलिकॉप्टरची सेवा वापरण्यात येते,
आणि सरकारी दवाखान्यातल्या सेवा मोफत असल्यामुळे नागरिकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसत नाही.
येथील शिक्षण व्यवस्था ही तशीच सरकारी आहे
येथील 80 ते 90% शाळा या सरकारी आहेत जिथे मोफत शिक्षण दिले जाते आणि नर्सरी पासून युनिव्हर्सिटी पर्यंत म्हणजे सर्व प्रकारचे टेक्निकल, इंजिनिअरिंग, मेडिकल शिक्षण या शहरात उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना 17 वर्षाच्या वयातच स्वावलंबी बनण्याचे धडे दिला जातात आणि अर्निंग आणि लर्निंग या तत्त्वावर ते कुठेतरी पार्ट टाइम जॉब करून स्वतःचे पॉकेट मनी कमवायला सुरुवात करतात.
येथील शेतकरी हा अगदी श्रीमंत सधन वर्गामध्ये मोडतो कारण त्याला अस्ट्रेलियाच्या शासकीय धोरणामध्ये अतिशय उच्च असे स्थान दिले जातं आणि सर्व बाबतीमध्ये त्यांना मदत केली जाते अतिशय आधुनिक पद्धतीने इथे शेती केल्या जाते इथे मोठ्या प्रमाणावर ऊस, गहू, डाळी, मका, केळी, पपया इत्यादी सर्व धान्य आणि फळ फळावळींचे उत्पादन घेतल्या जाते.
अजून एक प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया च्या सर्व भागांमध्ये कुठेही सिमेंटचे रोड दिसले नाही सगळीकडे डांबर रोडच होते आणि सिमेंट रोड वर कुठेही अवास्तव खर्च न करता पैसा जनतेच्या विकासासाठी वापरल्या जातो.
इथे कुठेही सामान्य जणांना बॉटलचे पाणी घेण्याची गरज पडत नाही कारण प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे नळ उपलब्ध आहे.
किंबहुना घरामध्ये किंवा सर्व ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी नळाद्वारे जे पाणी येते त्याची क्वालिटी ही 100% पिण्यायोग्यच असते.
आपल्या भारतात आजही तशा पद्धतीचे शुद्ध पिण्याचे पाणी खूप साऱ्या भागांमध्ये दिल्या जात नाही. Dr. Abhilasha gaoture
चंद्रपूर जिल्ह्यातील चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला विशेष करून शासकीय मागास वर्गीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी गुगल मीट द्वारे डॉक्टर अभिलाषा यांना शुभेच्छा दिल्या.
रत्नराज बहुउद्देशीय संस्थाद्वारे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण तसेच व्यवसाय लायसन्स व व्यवसाय अवजारे वितरण कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते माननीय अत्तदीप भगत यांनी केले होते
Google meet
गुगल मेट द्वारे शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये मुल,बल्लारशा, गोंडपिंपरी ,पोंभुर्णा,सावली, सिंदेवाही, चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे विद्यार्थी बाबूपेठ ,दुर्गापुर, ऊर्जा नगर नगीनाबागच्या सावित्रीबाई फुले महिला मंडळ इत्यादींनी भाग घेतला