News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपुरातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित पॅरामाऊंट कॉन्व्हेंट बाबूपेठ व मॅकरून स्टुडेंट अकॅडमी वडगाव द्वारा 23 डिसेंम्बरला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात वार्षिक सांस्कृतिक समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. Paramount convent babupeth
आयोजित कार्यक्रमात ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे, पांडुरंग आंबटकर, पियुष आंबटकर, प्रीती आंबटकर, प्रांजली आंबटकर, मुख्याध्यापक फैयाज शेख, आशिष वांढरे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, जमिर शेख, शोभना मॅडम तसेच साजदा सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक फैयाज शेख यांनी पॅरामाऊंट कॉन्व्हेंट चा उत्कृष्ट निकाल, केलेली कार्ये, विविध खेळांमध्ये केलेली कामगिरी याबाबत सविस्तर माहिती दिली.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आंबटकर यांनी पॅरामाऊंट शाळेच्या माध्यमातून उत्तम शिक्षण देण्याचं कार्य निरंतर सुरू असून पुढे ते असेच सुरू राहणार अशी ग्वाही दिली, सोबतच दरवर्षी पालकांवर शैक्षणिक शुल्काचा बोझा वाढू नये यासाठी प्रत्येकवेळी शुल्क भरण्यामध्ये सवलती दिल्या जातात.
अध्यक्षीय भाषणांनातर पॅरामाऊंट शाळेतील KG1, नर्सरी च्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले, ज्यामध्ये नृत्य, गाणे यांचा सहभाग होता.
आयोजित कार्यक्रमाचे संचालन त्रिशा होकम, रिया दास, पलक पटेल, वैष्णवी वैरागडे, तोमेश्वरी साहू, आयुष धाकडे, अनामिका आवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक भोलानाथ सरकार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता पुणेकर, मनीषा मस्के, सोनाली तामने, विद्या बोरडे, पूजा श्रीकोंडावार, शफीका खान, कामिनी सोरते, निशा सातपुते, श्रवती येनगंडूलवार, अर्चना साठोने, प्रणिता ठाकरे, सुदीप सरकार, प्रशांत बिस्वास, निलेश दुर्योधन, हर्ष आंबटकर, सुरेश झुंगरे, उज्वला शेंडे, चारुशीला वाकडे, धरती वाकडे, सुनंदा बोमावार, ऐश्वर्या खनके, अश्लेषा नगराळे, वैशाली खाडे, अश्विनी टिपले, किरण जीवतोडे, राजकुमारी रॉय, योगिता गरगेलवार यांनी परिश्रम केले.