News34 chandrapur
चंद्रपूर - कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियन्ट ने चीन मध्ये हाहाकार माजविला अश्या बातम्या काही दिवसांपासून पुढे येत आहे, मात्र त्याठिकाणी परिस्थिती काही औरच आहे. Vuhan corona
काही वृत्त वाहिन्यांनी थेट चीन मध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय युवकांशी संवाद साधत वूहान मधील परिस्थिती काय? याबाबत विचारणा केली असता तिथे सध्याची परिस्थिती साधारण असल्याचे त्यांनी प्रत्यक्षात दाखविले. Mock drill today in the country
मात्र चीन मध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे याचा धसका घेत केंद्र सरकारने देशातील कोरोना चा उपचार करणाऱ्या रुग्णालयात मॉक ड्रिल घेण्याचे ठरविले असून आज 27 डिसेंम्बरला प्रत्येक राज्यात मॉक ड्रिल होणार आहे.
2 वर्ष कोरोना विषाणू मुळे हजारो/लाखो नागरिकांचा बळी गेला मात्र ती चूक आता पुन्हा नको यासाठी आरोग्य विभागातील औषधांचा साठा, बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन याबाबत परिपूर्ण प्रात्यक्षिक होत आहे. Corona new Variant
सध्याच्या घडीला देशात व राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात आहे, कुठेही संसर्ग वाढत नाही, पण काही देशांमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे असे चित्र समोर येत आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज रहावी यासाठी हे मॉक ड्रिल घेण्यात येत आहे.