News34 chandrapur
चंद्रपूर - 24 डिसेंम्बरला चंद्रपूर जिल्हा स्टेडियम मध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचे वॉकिंग ट्रॅक व सिंथेटिक टॅंक चे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र सदर कार्यक्रम आधीच एकच गोंधळ उडाला होता, कारण शासनाने याबाबत 2 निमंत्रण पत्रिका तर भाजप ने 2 निमंत्रण पत्रिका प्रकाशित केल्या होत्या.
Shiv Chhatrapati Award winning sportsperson
कार्यक्रम आधी गोंधळ व कार्यक्रमात सुद्धा गोंधळ झाला, पालकमंत्री उशिरा आल्याने खासदार धानोरकर यांनी भूमिपूजन कार्यक्रम आटोपून घेतला, त्यांनतर उशिरा पालकमंत्री यांनी पुन्हा भूमिपूजन कार्यक्रम आटोपता घेतला.
पालकमंत्री मुनगंटीवार आले, भाषण सुरू झाले मात्र त्या गर्दीत सर्वांचे लक्ष शिव छत्रपती पुरस्कार विजेता राजेश नायडू यांनी वेधत हातात खेळाडूंचा अपमान थांबवा असे हातात फलक घेत विरोध दर्शविला.
अचानक झालेल्या या प्रकाराने आधीच गोंधळात पडलेल्या प्रशासनाने नायडू यांचेकडे धाव घेत त्यांना ताब्यात घेतले. Handball champion
राजेश नायडू हे चंद्रपूर जिल्ह्याचे हँडबॉल खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेता, भारताचे माजी उप कर्णधार, इंडियन युनिव्हर्सिटी चे कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त व कॉमनवेल्थ खेळातील रौप्य पदक विजेता. Commonwealth Games
वर्ष 1994-95 मधील त्यांनी देशातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करीत जिल्ह्याची मान उंचावली.
मात्र त्यांनतर राजकीय खेळीत त्यांची अनेकदा उपेक्षा करण्यात आली, राजकारण्यांनी त्यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव केला पण नोकरी दिली नाही, नोकरी मिळावी यासाठी त्यांनी अनेकदा पाठपुरावा केला पण त्याचा काही फायदा झाला नाही. Rajesh naydu
अनेकदा झालेल्या उपेक्षेने त्यांनी शिवछत्रपती पुरस्कार परत केला, मात्र त्यांना दिलेल्या आश्वासनानंतर अनेक वर्षांनी पुन्हा सह सन्मान देत पुरस्कार नायडू यांना परत देण्यात आला.
आता अनेक वर्षांनी तो प्रकार नायडू यांच्यासोबत पुन्हा घडला, चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जाणूनबुजून 24 तारखेच्या कार्यक्रमात त्यांना निमंत्रण देण्यास टाळले.
आजपर्यंत राजेश नायडू यांना जिल्ह्यातील अनेक शासनाच्या क्रीडा कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले मात्र 24 डिसेंम्बर ला त्यांना निमंत्रित न करण्यात आल्याने त्यांनी प्रशासनाचा शांतीप्रिय मार्गाने निषेध केला.
चंद्रपूर जिल्हा स्टेडियम च्या कार्यक्रमात उदघाटन करण्यात आलेल्या पाहुण्यांमध्ये एकाही लोकप्रतिनिधी यांचे खेळाविषयी योगदान नसताना सुद्धा त्यांना आमंत्रित करण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुलातील कार्यक्रमात खेळाडूंचा हा अपमान कशाला? असा प्रश्न राजेश नायडू यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
राज्यात किंवा जिल्ह्यात जेव्हा राज्य स्तरीय, जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा होतात तर त्यावेळी खेळाडू यांची काय उपेक्षा होते यावर न बोललेलचं बरं.
चंद्रपूर जिल्ह्याचं नाव लौकिक करणाऱ्या खेळाडू यांचा अपमान करणे क्रीडा अधिकारी यांच्या पदाला शोभत नाही, आम्ही देशासाठी खेळलो पण त्यासाठी आम्हाला अनेकदा संघर्षाचा सामना करावा लागला होता.
पुरस्कार मिळाला मात्र पुरस्कार प्राप्त खेळाडू याला जगण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची उपेक्षा न व्हावी यासाठी राज्य शासनाने त्यांना 25 हजार रुपये पेन्शन द्यावी अशी मागणी राजेश नायडू यांनी यावेळी केली. Insulting players
जर पुरस्कार प्राप्त खेळाडू यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असेल तर आम्ही शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू धरणे आंदोलन करू वेळ आली तर पुन्हा पुरस्कार परत करू, त्यानंतरही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आत्मदहन करण्यास आम्ही मागेपुढे बघणार नाही, हा आमचा अपमान नसून शिवछत्रपती पुरस्काराचा अपमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू राजेश नायडू यांनी पत्रकार परिषदेत दिली