News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल :- शेतशिवारात उभ्या असलेल्या कापसाच्या ढिगा-याला अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना शनिवारी दुपारी मरेगाव येथे घडली.आगीत कापूस वाजळून खाक झाला. यात शेतक-याचे जवळपास दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. Cotton fire
चीमढा येथील श्री. लोनबले यांच्या मालकीची शेती आंध्रप्रदेशातील नरसीपेठ येथील माधवी श्रीनिवास कोमटनिघी हा कापसाच्या शेतीसाठी सावली तालुकयातील चारगाव येथे स्थायीक झाला. त्याने चिमढा येथील लोनबले यांची अठरा एकर शेती कापसाच्या लागवडीसाठी भाडयाने घेतील. यंदा कापसाचे पीक जोमदार आले.त्यामुळे वेचणी झालेल्या कापसाचा ढिगारा शेतात उभा होता.कापूस व्यापा-याला विकण्याच्या तयारीत होता.त्याआधीच अज्ञात इसमाने त्या कापसाच्या ढिगा-याला आग लावली.त्यात कापूस पूर्णता जळून खाक झाला. जवळपास दोन लाख पन्नास हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. loss to farmers
शेती करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कोमटनिधी हा स्थायिक झाला होता. परंतु त्याच्या मेहनतीवर अज्ञात इसमाने पाणी फेरले.घडलेल्या घटनेमुळे त्याच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. शेतकरी शनिवारी दुपारी शेतात गेला असता कापसाच्या ढिगा-याला आग लागून कापूस पूर्णता जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात इसमाविरूदध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलिस करीत आहे. अशा आकस्मिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी विनंती नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबीयांनी केली आहे.
