News34 chandrapur
चंद्रपूर - नेहमी वादात असलेले गोंडवाना विद्यापीठाचा अजून एक भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. Gondwana university
ओडिशा येथे विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत चंद्रपूर व इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांची विविध स्पर्धेसाठी निवड झाल्यावर विद्यार्थी ओडिशा येथे पोहचले मात्र स्पर्धेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेशच नाकारला. कारण होतं की विद्यापीठातर्फे स्पर्धेला पात्र खेळाडूंची यादी ओडिशा येथे पाठविण्यात आली नव्हती.
रात्री 9 वाजता चंद्रपूरचे विद्यार्थी ओडिशा येथे अडकले, मात्र एका विद्यार्थ्याने सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांना विद्यापीठातर्फे झालेल्या चुकीची माहिती दिली, बेलखेडे यांनी रात्री गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बोकारे यांना सम्पर्क करीत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. Mismanagement of Gondwana University
बेलखेडे यांनी कुलगुरू बोकारे यांना तात्काळ ओडिशा स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांना गोंडवाना विद्यापीठातील खेळाडूंची यादी मेल करायला लावली, कुलगुरू बोकारे यांनी विद्यापीठाची चूक लक्षात घेता रात्रीच खेळाडूंची यादी मेल केली.
यादी ओडिशा येथे पोहचताच स्पर्धेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला अन्यथा त्यांना स्पर्धेत सुद्धा सहभागी होता आले नसते.
विद्यार्थ्यांची सतर्कता व सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांना विद्यार्थ्यांच्या समस्यांची अडचण लक्षात घेता वेळेचेही भान न ठेवता तात्काळ त्यांनी ही अडचण दूर केली.
स्पर्धेसाठी पात्र खेळाडूंनी सिनेट सदस्य निलेश बेलखडे यांचे आभार मानले.