News34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई - 100 कोटी वसुली प्रकरणात न्यायालयाने माजी मंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा देत जामीन अर्जावर स्थगिती च्या CBI च्या अर्जाला फेटाळून लावले. Ex-minister anil deshmukh bail
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचार प्रकरणी जामीन देण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने 27 डिसेंबर 2022 पर्यंत स्थगिती दिली होती. मनी लॉड्रिंग प्रकरणी देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. मात्र, त्यांच्या जामीनावर आक्षेप घेत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी याचिका दाखल केली होती. High court
अनिल देशमुख यांनी याचिकेतील वैद्यकीय आणि गुणवत्तेच्या आधारे जामीन देण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या एकल खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात निर्णय राखून ठेवला होता. सीबीआयने त्यांना या वर्षी एप्रिलमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असताना देशमुख यांची प्रकृती लक्षात घेता भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीला प्राधान्य दिले जावे, असे प्रथमदर्शनी मत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात सांगितले होते.