News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्हा क्रिडा संकुल येथे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनसह येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांडून शुल्क आकारण्याचा घेण्यात आलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देतांना माहिती घेऊन आकारण्यात आललेले शुल्क रद्द करण्याचे आश्वासन क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहे.
Chandrapur district sports stadium
Chandrapur district sports stadium
जिल्हा क्रिडा संकुल येथे येणाऱ्यांकडून शुल्क घेण्याचा निर्णय क्रीडा संकुलच्या वतीने घेण्यात आला होता. याचा सर्वत्र विरोध होत असतांना आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर प्रश्न नागपूर येथे सुरु असलेल्य हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले कि, चंद्रपूरला सिंथेटिक ट्रॅक हा शासनाच्या पैशातुन तयार करण्यात आला आहे. सध्या पोलीस विभागासह ईतर विभागाच्या भरत्या सुरु आहे. अशात जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी येथे येणा-या सरावासाठी येणाऱ्यांकडून खेळाडूंकरीता 500 रुपये आणि जनतेकरीता 300 रुपये असा मासिक शुल्क आकारलेला आहे. हा शुल्क तात्काळ रद्द करावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली. यावर उत्तर देतांना क्रिडा मंत्री गरिष महाजन यांनी सदर प्रकाराची माहिती घेऊन शुल्क आकारणीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या क्रिडा संकुलात पोलीस भरतीचा सराव करत असलेल्या विद्यार्थ्यांसह येथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. Nagpur Winter session 2022