News34 chandrapur
चंद्रपूर - वर्ष 2012 पासून प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, या अवैध धंद्यात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक व्यक्ती सहभागी असून कारवाई झाल्यावर सुद्धा पुन्हा ही तस्करी सुरू करतात. Tobacco smuggling chandrapur
मात्र आजपर्यंत एकानेही हा अवैध धंदा बंद केला नसून तो सतत सुरू आहे, आता सुगंधित तंबाखू तस्करी ही वर्चस्वाची लढाई बनली असून या धंद्यात समोर कोण राहणार ही स्पर्धा सुरू आहे.
चंद्रपुरात 2 दिवसांपूर्वी रय्यतवारी येथील मुकेश गुप्ता यांनी भाड्याच्या घरात सुगंधित तंबाखू लपून ठेवला होता, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारीत 1 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Chandrapur crime
मुकेश गुप्ता यांच्यावर झालेली ही या वर्षाची दुसरी कारवाई आहे, 19 एप्रिल 2022 ला मुकेश गुप्ता यांच्या गोडाऊन वर छापामार कारवाई केली होती.
याआधी 22 मे 2020 ला सुद्धा गुप्ता यांच्या किराणा दुकानात अन्न व औषध विभागाने कारवाई केली मात्र त्यानंतर सुद्धा गुप्ता यांची सुगंधित तंबाखू तस्करी सुरूच आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात झिमरी, ठक्कर, गुप्ता व असे अनेक मोठे नाव या व्यवसायात गुंतले आहे, यांच्यावर अनेकदा गुन्हे सुद्धा दाखल झाले त्यानंतरही तंबाखू तस्करी अविरतपणे सुरूच आहे.
झिमरी च्या गोदमावर अनेकदा छापमार कारवाई झाली, त्यानंतर पुढची सूत्रे गुप्ता च्या हाती आली, सोबतच बाबूपेठ येथील हनुमान ने ही हातभार लावला.
गुप्ता यांचं रयतवारी कॉलरी येथे किराणा दुकान आहे त्या दुकानाच्या आड हा व्यवसाय चालतो, रामनगर पोलिसांनी आता कारवाई मुकेश गुप्ता यांच्यावर कारवाई केली असली तरी पुढे या तस्करीची परिस्थिती जैसे थे असणार आहे.
राजकारणी येतात आश्वासन देऊन जातात मात्र या तस्करी वर कडक कायदा आजही बनण्यासाठी कुणीही आवाज उचलला नाही, फक्त या तंबाखू मुळे होणारा कॅन्सर सारख्या आजारावर रुग्णालय बांधण्याचा देखावा मात्र करतात.
सुगंधित तंबाखूची तस्करी करीत युवकांना कॅन्सर सारखा आजार देणाऱ्या या यमदूतांना प्रशासन कधी हद्दपार करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
