News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सहकार विभागाच्या अध्यक्षा एड.शुभांगी शेरेकर ह्या चंद्रपूर गडचिरोली दौऱ्याच्या निमित्ताने मुल येथे धावती भेट दिली असता मुल तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात त्यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सहकार आघाडीचे अध्यक्ष साहेबराव ठाकरे, एकोना ग्राम पंचायत सरपंच गणेश चवले, श्री.अ.शेरेकर ,मुल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला काँग्रेस अध्यक्षा रुपलिताई संतोषवार, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडुभाऊ गुरनुले, न.प.नगर सेविका ललिता फुलझेले संदीप वाढई, यांचे उपस्थितीत एड.शुभांगी शेरेकर यांचा काँग्रेस कमेटी कार्यालयात शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सहकार क्षेत्राशी निगडित विषयाशी चर्चा करतांना काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात सी.डी.सी.सी.बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, आदर्श खरेदी विक्री सहकार सोसायटी, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, प्रायमरी सहकारी सोसायटी आणि तालुक्यातील अनेक सेवा सहकारी सोसायट्या काँग्रेसच्या ताब्यात असल्याचे तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी सहकार विभागाचा आढावा सांगितला. मुल येथे काँग्रेसची स्वतंत्र इमारत असल्या बद्दल काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.