News34 chandrapur
चंद्रपूर - रामसेतु दाताळा रोड वरील ब्रीज ला रोषणाई करण्याकरिता 3 कोटी रुपये खर्च केले म्हणून पालकमंत्री गवगवा करतात. मात्र अनेक वर्षांपासून निधी रखडलेल्या बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाकडे पालकमंत्री दुर्लक्ष करीत आहे. Babupeth railway flyover
निधी नव्हता म्हणून काही महिन्यांपूर्वी उड्डाणपूलाचे बांधकाम थांबले होते, त्यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांनी आम्ही निधी आणला याकरिता श्रेयवाद सुरू केला, मात्र आता त्या पुलाचे काम मंद गतीने होत आहे, याकडे एकही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आहे, निधी आणला म्हणून भाजप ने रेल्वे उड्डाणपुलावर ढोल वाजविला होता, मात्र आता काम मंद असताना कंत्राटदाराचा ढोल वाजविणार काय असा प्रश्न चंद्रपूर आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे.
Chandrapur aam aadmi party
बाबूपेठ मधील रेल्वे गेट मुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी असो अथवा कामावर जाणारे कामगार किंवा आपात्कालीन वेळेत रुग्णालयात धाव घेणाऱ्या रुग्णांना या रेल्वे गेट मुळे एक एक तास अडकून राहावे लागते. 30 वर्षापासून या ठिकाणी रेल्वे ब्रीज ची मागणी होती पण त्या मागणीकडे अनेकांनी पाठ फिरवली, पण दाताला पुलाची मागणी नसताना सुद्धा तिथे पूल मंजूर करीत लवकर तयार करीत सुरू ही करण्यात आला.
Bjp chandrapur
मागील 2017 च्या मनपा निवडणूकी दरम्यान विद्यमान पालकमंत्री तथा वन मंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी दोन ते तीनदा या ब्रीज च्या कामाचे भूमिपूजन केलें होतें, परंतु निवडणूक होऊन सत्तेत येताच त्यांना याचा विसर पडला की काय तसेच रोशनाई महत्वाची की बाबुपेठ पुल असा प्रश्न बाबुपेठ ची जनता करू लागली आहे.
या ब्रिजच्या पाठोपाठ दाताला आणि पठानपुरा गेट समोरील ब्रीज चे काम सुरू झाले होते मात्र या दोन्हीं ब्रीज चे काम पुर्ण होऊन 2 वर्ष लोटून गेले परंतू बाबूपेठ ब्रीज चे काम आजपावेतो 50 टक्के सुध्दा पूर्ण न झाल्याने जनतेमध्ये शासन आणि प्रशासना बद्दल रोष व्यक्त केला जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टी चे शहर सचिव तथा सहप्रभारी राजू कुडे यानी केला असून आता तरी विशेष निधि उपलब्ध करुण बाबूपेठ उड़ान पुलाच्या कामाला गति द्यावी अशी मागणी आप द्वारे करण्यात आलेली आहे.
लवकरच आम आदमी पार्टी तर्फे ह्या मागणीला घेऊन ठीय्या आंदोलन करन्यात येईल असा इशारा आप तर्फे देण्यात आला आहे.
तसेच एकाला न्याय तर दुसऱ्याला दुजाभाव असा प्रकार पालकमंत्री यांनी करू नये, बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाची नागरिकांना अत्यन्त गरज आहे, नागरिकांच्या मूलभूत समस्येकडे आधी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे, अन्यथा आम आदमी पार्टी सतत बाबूपेठ वासीयांवर होणाऱ्या अन्यायाबाबत गप्प बसणार नाही असा इशारा आप ने दिला आहे.